vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू*विविध विभागांचा घेतला आढावा

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू*विविध विभागांचा घेतला आढावा

     अमरावती, प्रतिनिधी: अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा आजपासून सुरू झाला आहे. समिती उद्यापासून दोन दिवस धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा दौरा करणार आहे.

  अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात आज सकाळी समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, संस्थांचे प्रतिनिधी यांचे निवेदने स्विकारली.  त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले यांनी समितीच्या कामकाजात सहभाग घेतला.

समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगर परिषद, पोलिस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राज्य उत्पादन शुल्क, वन, पुरवठा, क्रिडा, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, शिक्षण, सामान्य प्रशासन, बांधकाम, पाणीपुरवठा, लघू पाटबंधारे, आरोग्य, आदिवासी विकास, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन, राज्य परिवहन महामंडळाचा आढावा घेतला. समिती सदस्यांनी प्रत्येक विभागातील पदभरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी, तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत चर्चा केली. तसेच उपयुक्त सूचना केल्या.

00000

संबंधित पोस्ट

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

संकटात महिलांना सावरणारं ‘ #सखीवनस्टॉपसेंटर ’पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा.

15एप्रिल,2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता; बुलढाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ४५ लाख मदतीच्या निधीस मान्यता- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर-मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष…