vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संकटात महिलांना सावरणारं ‘ #सखीवनस्टॉपसेंटर ’पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा.

संकटात महिलांना सावरणारं ‘ #सखीवनस्टॉपसेंटर ’पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा

 

नांदेड, प्रतिनिधी : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नांदेड अंतर्गत चालविण्यात येणारे सखी वन स्टॉप सेंटर हे संकटग्रस्त महिलांसाठी एक सुरक्षित व आधारदायी केंद्र ठरत आहे.

महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाने या केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामार्फत महिलांना कायदेविषयक मदत, वैद्यकीय सेवा, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समुपदेशन तसेच तात्पुरता निवारा अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले हे केंद्र महिला व बालविकास भवन, महात्मा फुले मार्केट शेजारी, गणेश नगर रोड, नांदेड येथे २४ तास सुरू असून, अनेक पीडित व गरजू महिलांना याचा लाभ मिळत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना संकटातून सावरण्यासाठी आणि आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी प्रभावी मदत मिळत आहे

सखी वन स्टॉप सेंटर मध्ये शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक अत्याचार ग्रस्त महिलांना मदत मिळू शकते. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी, बलात्कार, लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर घटनांतील पीडित महिलांना तातडीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे महिलांना निर्भयपणे परिस्थितीचा सामना करण्यास मदत होते

तसेच, १८१ महिला हेल्पलाईन ही सेवा देखील या केंद्रामार्फत २४ तास कार्यरत आहे. कोणत्याही संकटात असलेल्या महिलांनी किंवा अशा प्रकारची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित १८१ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बांद्रा कलानगर अरुणोदय वाकस तर्फे ध्वजवंदन पुस्तक प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक– रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन