vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील-

बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी  :– महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मंत्रालयात जनसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाशी संबंधित विषयांबाबत बैठक झाली. या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी सचिव परिमल सिंह , उपसचिव प्रतीक्षा पाटील, वित्त आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले , महात्मा फुले कृषी विद्यापीठमधील प्रकल्पग्रस्त प्रतीक्षा यादीतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत सामावून घेतले होते. त्याच्या जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीबाबत योग्य विचार करण्यात येईल. यावेळी 2025 मध्ये वर्ग क आणि वर्ग ड मधील पद भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण पदांवरील नियुक्ती , ई डब्ल्यू एस व एस सी बी सी प्रवर्गातील पदांवर उमेदवारांची नियुक्तीच्या अनुषंगाने कार्यवाही बाबत माहिती देण्यात आली.

 

विद्यापीठाच्या वर्ग क आणि ड वर्गातील रिक्त पदांसाठी 2025 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. क वर्ग यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही करताना गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, निवड आणि प्रतीक्षा यादीची प्रक्रिया केली जावी असे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. 2005 नंतर नियुक्त प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मागणी बाबत सकारात्मक असून याबाबत सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाकडे कार्यवाही साठी पाठवण्यात यावा, अशी सूचना यावेळी दिली.

2025 च्या भरती प्रक्रियेमधील वर्ग ड पदांसाठी शासन नियमानुसार निवड प्रक्रिया राबवून 143 पदांवर नियुक्ती देण्यात आली. परंतु वर्ग क पदांमधील भरती प्रक्रियेसाठी नियमानुसार परीक्षा आयोजित करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. तसेच यातील निवड यादी व प्रतीक्षा यादी अंतिम होणे बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न..

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहाच्या चळवळीतून सामाजिक सुधारणा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

सौर ऊर्जा प्रकल्पाला मिळालेली मंजुरी हे आपल्या पाठपुराव्याचे यश – कैलास गोरंटया ल—-आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा विद्यमान आमदारांचा प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

मान्सूनमधील आपत्तीत एकही मृत्यू होऊ नये- जिल्हाधिकारी सौरभ कटियार*मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा