स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव
स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव
-जालना, (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या स्त्रीशक्तीचा शहरात सदैव सक्रीय असणार्या आधार ग्रुपच्या वतीने शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिरयेथे गौरव करण्यात आला.व्यासपिठावर आधार ग्रुपचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अश्विन
भास्करराव अंबेकर, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, पंडितरावलव्हटे यांच्यासह ग्रुपचे सदस्य कुणाल देशमुख, संदीप मगर, आकाश बारगजे,अभिमन्यू काठोटीवाले, ज्ञानेश्वर बदर, भूषण वानखेडे, गौरव इंगळे आदींचीउपस्थिती होती. यावेळी आरोग्य क्षेत्रातून शुभांगी छडीदार राऊत, सेवाक्षेत्रातून आनंदी अय्यर, क्रीडा क्षेत्रातून तेजल साळवे,स्वच्छताक्षेत्रातून कांताबाई घुले, उद्योग क्षेत्रातून संजीवनी जाधव, शिक्षण क्षेत्रातून डॉ.शिवनंदा मेहत्रे, कृषी क्षेत्रातून उमा क्षीरसागर, कृषीजोडउद्योग अंकिता मोरे, वैमानिक गार्गी गिरी, यांना नवदुर्गा पुरस्कार तरशिलाताई ढाकणे यांना जीवनगौरव देऊन कवयित्री संजीवनी तडेगावकर यांच्याहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानाचे स्वरूप साडी-चोळी,शाल, गौरवपत्र व भेटवस्तू देऊन असे होते.यावेळी प्रसिद्ध साहित्यिक संजीवनी ताडेगावकर यांनी मार्गदर्शन करतांना
म्हणाल्या की, स्त्रीमध्ये मुळातच संघर्ष करण्याची नैसर्गिक शक्ती आहे.विपरीत परिस्थितीत संसाराचा गाडा त्यांना हाकावा लागतो. आजही स्त्रीलासंघर्ष करूनच आपले अस्तित्व सिद्ध करावे लागते. स्त्रियांना संघर्षाशिवायकाहीच मिळत नाही. स्त्रीला दुर्बल समजून दुय्यम वागणूक देणे योग्य नसूनप्रत्यक्षात ती प्रचंड शक्तिशाली आहे. सर्वच भगिनींनी विविध क्षेत्रातआपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पुरुषांशी तुलना केल्यास स्त्रिया ह्याअधिक प्रामाणिक, निर्व्यसणी याप्रमाणे सर्व गुणसंपन्न असतात हे सिद्धहोते. आधार ग्रुपचे अध्यक्ष अश्विन भास्करराव अंबेकर यांचे कौतुक करते
की, वडील राजकारणी असतानाही त्यांनी आधार ग्रुपच्या माध्यमातूनराजकारणाऐवजी समाजकारण करण्यास सुरुवात केली.खर तर आजचा तरुण व्यसनाधीन होत असताना व विविध राजकीय पक्षांमध्य
अर्थहीन नेतेगिरी करून स्वतःला मिरवून घेत असताना आधार ग्रुपचे अध्यक्षअश्विन अंबेकर व त्यांचे सर्व सदस्य सहकारी अडचणीच्या काळात दुर्बल व गरजवंतांच्या पाठीमागे उभे राहतात खरंतर तरुणांनी कोणाच्याही हातचेबाहुले न बनता असेच सामाजिक कार्य करावे. असे कार्यक्रम समाजाला दिशादेण्याचे कार्य करतात. आधार ग्रुपचा हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे.या महिलांचा गौरव करून त्यांचे कौतुक केले. त्यामुळे त्यांना अधिकलढण्याचे बळ मिळेल. आधार ग्रुपने अत्यंत योग्य व्यक्तींची निवड यापुरस्कारासाठी केली असून त्यामुळे स्त्रियांचे कर्तुत्व जनतेसमोर येण्यासमदत होईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अश्विन भास्करराव अंबेकर म्हणाले की,समाजाचे दुःख वेचण्याची आवड असणारा तरुण राजकारणात आला तर समाजातील गढूळपणा कमी होऊन युवाशक्तीचा वापर केवळ राजकारणासाठीच नाहीतर समाजघडवण्यासाठी होईल. आधार ग्रुपच्या च्या वतीने पूरग्रस्त, कोरोनाग्रस्त व गरजूंना मदतीची अनेक कामे करण्यात आली. त्याचबरोबर गौरव करण्यात आलेल्या सर्व भगिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पुढे आल्या आहेत.त्यामुळे खरी दुर्गाशक्ती आपल्या आजूबाजूलाच असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्यक्षात कार्य करणार्या या दुर्गाशाक्तीचा गौरव होणे हीअत्यंत गरजेचे आहे.यापूर्वी आधार ग्रुपने विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजूलोकांना मदत केली, आता पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचेकीटचे वाटप, हिवाळ्यात गरम चादरींचे वाटप केले. समाजातील विविध क्षेत्रातकाम करणार्या नारीशक्तीचा सत्कार करण्याचा भाग्य आम्हाला लाभत असल्यानेआम्ही अत्यंत भाग्यवान समजत असून समाजाप्रती आपले योगदान अत्यंत अनमोलआहे या छोट्याशा सत्काराने त्याचे उतराई होता येणार नसल्याचे अश्विन अंबेकर म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती पल्लवी खरात यांनी केले. यावेळी आधारग्रुपचे प्रशांत गिराम, मुरली गायके, यांचासह ज्ञानेश्वर गाढवे, प्रेमलापंडित, प्राचार्य विकास राठोड, अंबादास घायाळ, राजेंद्र साळवे, शिवरामगिराम, शिव हरी मांटे, अमोल पवार, कीर्ती खैरे, सीमा इंगळे, संजय खरात,पुरुषोत्तम चौरे, रामकिसन मोहिते, विद्या चौधरी, अरुणा मांटे, कांचन वाघ, लक्ष्मी वाटाणे, विद्या भालेराव, किशोर शेळके तुकाराम चव्हाण सुखदेवघोडके संगीता केंद्रे, योगिता नागरे, कडूदास खरात, शिल्पा सानप, विद्याखिल्लारे यांच्यासह महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.