vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

मुंबई, प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीत मंत्री राणे यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पाहणी दरम्यान, नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक प्रशासनिक पावले, मदत आणि साहाय्य यावर चर्चा करण्यात आली. मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या ठोस सूचना दिल्या, जेणेकरून नुकसानाचे अचूक दस्ताऐवजीकरण होईल आणि त्यानंतर योग्य आर्थिक व प्रशासनिक मदत पोहोचवता येईल.या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार अनुराधा चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच इतर संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या अडचणींवर चर्चा केली आणि तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाची तत्परता यावर भर दिला.0

000

संबंधित पोस्ट

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

वनमंत्री  यांच्या अध्यक्षतेखाली,वन विभागाच्या विविध विषयांवर आढावा बैठक संपन्न,जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत..-वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

प्रासंगिक लेख / आंबेडकर जयंती / 14 एप्रिल 2026  बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट…