vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानस्थानिक बातम्या

तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, प्रतिनिधी :- राज्यभरातील तरुण- तरुणींच्या सक्रिय सहभागातून राज्य शासनाचे सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसमावेशक युवा धोरण निर्मितीसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौशल्य विकास आदी पैलूंचा सर्वस्पर्शी विचार करून युवकांकडून सूचना मागविण्यात याव्यात, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

 राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची आढावा बैठक मंत्रालयात झाली. युवकांनी शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक व बौद्धिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहावे यासाठी युवा धोरणात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शीतल तेली-उगले, पद्मश्री कांती शहा, आमदार सत्यजीत तांबे, प्रविण दटके, आशुतोष काळे, डॉ. बाबासाहेब देशमुख, राजेश पवार, संतोष दानवे, अमित गोरखे, अभिजीत पाटील, रोहित पाटील, मॉर्डन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे तसेच विविध राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कार विजेते आणि विविध युवा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे धोरण पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रमांचा समावेश करावा. महिला व बालविकास विभाग, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास विभाग आदी विभागांच्या समन्वयातून युवकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर देण्यात यावा.

राज्यातील सर्व तरुणांना धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात यावेत. युवकांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, मानसिक कल्याण, व्यसनाधीनता निर्मूलन, शिक्षण, रोजगार, उपजीविका, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर गुन्हेगारी प्रतिबंध, डिजिटल तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या बाबी युवा धोरणाचा भाग असाव्यात, असे निर्देशही ॲड. कोकाटे यांनी यावेळी दिले.

 

****

संबंधित पोस्ट

विदर्भातील उद्योगवाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री- सीआयआयच्या विदर्भ विभागीय कार्यालयाने अभ्यास करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न