vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

 

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्ह्यातील शहिदांच्या माता-वीर पत्नी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना शासकीय जमिन वाटपाबाबत शासनाचे धोरण असून सैनिकांबाबतचे प्रश्न यंत्रणेने संवेदनशीलतेने सोडवावेत ज्यांना शासकीय जमिनी देय आहेत अशांना पर्यायी जागा दाखविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शहिद जवानांच्या वारसांना जमिन वाटपा संदर्भातील कामकाजाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, यांच्यासह शहिद जवानांचे वारस, उपस्थित होते.

 युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थिती किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत वीर मरण आल्यास अशा जवानांच्या अथवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना शेती प्रयोजनार्थ 2 हेक्टर कोरडवाहू जमिन देण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे. तसेच सन 1971 भारत-पाक युध्दातील व सन 1962 च्या भारत-चीन युध्दातील सन 1965 च्या भारत-पाक युध्दातील व ऑपरेशन पवन मधील युध्दातील शौर्य पुरस्कार मिळालेल्या सैनिकांना किमान एक गुंठा, कमाल 3 गुंठे शेती प्रयोजनार्थ कोरडवाहू 2 हेक्टर जमिन देण्याची तरतूद आहे. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहिद जवान, माजी सैनिक यांच्या संदर्भातील प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील 40 शहिदांच्या वारसांना त्यांचा पसंतीक्रम मिळविण्यासाठी 4 पर्यायी जागा दाखविण्यात याव्यात. असेही त्यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीत त्यांनी सन 1999 मध्ये शहिद झालेले गजानन मोरे यांच्या वीर माता श्रीमती चतुराबाई मोरे यांना जागा वितरणाचे प्रमाणपत्र सन्मानपूर्व प्रदान केले.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री नृसिंहाचे दर्शन

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४३० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर· जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र· दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय