vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधा सुधारण्यावर भर- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधा सुधारण्यावर भर- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

             मुंबई, द प्रतिनिधी- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी- सुविधांमध्ये सुधारणा करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पध्दतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मुंबईतील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह वरळी 116, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 116, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 118 या वसतिगृहांना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहाय्यक आयुक्त मुंबई शहर, उज्ज्वला सपकाळे, सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर प्रसाद खैरनार उपस्थित होते.

वरळी येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचा पुर्नविकास करताना विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 200 ते 250 चौ.फूट इतकी जागा प्रत्येक खोलीत उपलब्ध करुन देण्यात येईल, जेणेकरुन विद्यार्थी पुरेशा जागेत राहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या कॉट ,गादया व कपाटे, अद्ययावत कॉम्प्युटर, स्पर्धा परिक्षेची अद्ययावत पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. विदद्यार्थ्यांना देण्यात येणा-या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातील असेही श्री. शिरसाट यांनी सांगितले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्री. शिरसाट यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून श्री.शिरसाट यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या वसतिगृहातील अचानक भेटीमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.००००

संबंधित पोस्ट

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे- मुख्यमंत्री आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…

आतची मोठी बातमी- नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये १०:०२ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले*             

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; गोकुळ तर्फ पाटण येथे ८ घरकुले लाभार्थ्यांना हस्तांतरित