vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

रायगड, प्रतिनिधी:- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. त्या लाभार्थींना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात आली होती. परंतु विहित मुदत संपून गेली असतानादेखील बऱ्याच लाभार्थींनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही त्या सर्व थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व थकीत व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे, जेणेकरुन भविष्यात होणारी संभावित कायदेशीर कार्यवाही टाळावी असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ रायगड-अलिबाग गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे.

थकीत लाभार्थींनी कर्ज खाते बंद केल्यास महामंडळाच्या सध्या सुरु असलेल्या नवीन आकर्षक बिनव्याजी रु.15 लक्ष पर्यंत कर्जाच्या योजनेमध्ये लाभ घेता येयेईल

000०

संबंधित पोस्ट

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानवडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण 

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा*

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत..