vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानवडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानवडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण

 

लातूर, प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी विविध शासकीय योजना मंजुरी प्रमाणपत्रे, दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

 

रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, पंचायत समिती सदस्य मिरावती कसबे, गजानन होनराव, भुजंगराव शिंदे, वडवळ नागनाथचे सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांच्यासह वडवळ नागनाथ महसूल मंडळातील सरपंच व नागरिक यावेळी उपस्थित होते.

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरामुळे एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा, योजनांचा लाभ मिळत आहे. महसूल विभागामार्फत पांदण रस्ते, शेत रस्त्याची कामे केली जात आहेत. यासाठी सुटसुटी धोरण तयार करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक दाखले वाटपाची कार्यवाही गतिमान करण्यात आली असल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून शेती आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी यामध्ये भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

 

उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी समाधान शिबिराच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा महसूल मंडळात एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी प्रास्ताविक केले. महसूल विभागाच्या योजना, सेवांची माहिती व लाभ देण्यासोबतच इतरही शासकीय विभागांच्या योजनांची माहिती समाधान शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या शिबिरात महसूल विभागाच्या जवळपास पंधरा सेवा देण्यात येत आहेत. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, पुरवठा विभागामार्फत नवीन शिधापत्रिका, आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, महिला व बालविकास विभागामार्फत बेबी कीटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांच्या गटासाठी अनुदान धनादेश वितरण करण्यात  माहिती घेतली.

संबंधित पोस्ट

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी अजय दाभाडे यांची नियुक्ती