vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

15 हजारहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेत जमा केला 81 कोटी कर**अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध*

15 हजारहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेत जमा केला 81 कोटी कर**अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध*

 

          नवी मुंबई प्रतिनिधी महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक असून अद्यापही ज्या थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांनी तो ३१ मार्च २०२६ पर्यंत भरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

          आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७५५ कोटी रुपये मालमत्ताकर जमा झाला असून आतापर्यंत २ लाख १४ हजार ९०० मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. यापैकी ६१.५ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाईन तर ३८.५ टक्के मालमत्ताधारकांनी ऑफलाईन पद्धतीने कर भरला आहे.

          याशिवाय मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेत १५ हजार ९२ थकबाकीदारांनी एकूण ८१ कोटी ३४ लाख ४९ हजार ६८९ रुपये मालमत्ता कर भरला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेस नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिल्याने महानगरपालिकेच्या मालमता कर विभागाने मालमत्ता कर वसूलीची मोहिम अधिक गतीमान केली आहे.

          नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे यादृष्टीने पुढील 3 दिवस म्हणजेच शनिवार (२८ मार्च) व रविवार (२९ मार्च) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी व सोमवारी (३० मार्च) देखील महानगरपालिकेची कर संकलन केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ७ तसेच ३१ मार्च २०२६ या दिवशी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे.

          महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यावर्षी कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

          याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, अनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.

सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी निर्दिष्ट कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून या योजनेचा लाभ घेण्याची अखेरची मुदत दि. ३१ मार्च २०२६ रोजी, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. याशिवाय मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट देऊन किंवा WhatsApp Chatbot – 8291920504 द्वारे किंवा कर संकलन केंद्रात प्रत्यक्ष जाऊन आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

 

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी – अखेरचे 4 दिवस शिल्लक      नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कर एकरक्कमी भरल्यास विलंब दंडावर ५०% सवलत दिली जात आहे. या योजनेला नागरिकांचा उत्साही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक थकबाकीदार मालमत्ताधारकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांनीही ही संधी न दवडता त्वरित कर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta