vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहाता तालुक्यात ‘महाराजस्व अभियान शिबिर’ उत्साहात संपन्न,एकाच छताखाली शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

राहाता तालुक्यात ‘महाराजस्व अभियान शिबिर’ उत्साहात संपन्न,एकाच छताखाली शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

शिर्डी, प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर मंडळात महसूल प्रशासन व विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर (टप्पा क्र. १)’ उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व दाखल्यांचे थेट वाटप करण्यात आले.

हे शिबिर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, भूमी अभिलेख अधीक्षक योगेश थोरात आदी अधिकारी उपस्थित होते

बाभळेश्वर खुर्द येथे आयोजित समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला एकूण ७६५ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. प्रशासनाने यापैकी ५२४ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ दिला.

शिबिरात १५८ शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न व जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत ६३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ४९ लाभार्थ्यांना डिजिटल सातबारा, ४० जणांना युडीआयडी कार्ड, ३९ जणांना शिधापत्रिका, ३५ जणांना सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजना तसेच २५ लाभार्थ्यांना जिवंत सातबारा (वारस नोंद) यांचा लाभ देण्यात आला

याशिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांचाही लाभ शेतकऱ्यांनी घेतला. यामध्ये भाऊसाहेब फुंडकर योजना (१७), राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (१३) व पीएम किसान योजना (८) या योजनांचा समावेश आहे

महाराजस्व अभियानातून प्रलंबित कामे निकाली,बाभळेश्वर बुद्रुक येथे दि. ७ मार्च २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मोठ्या प्रमाणावर निकाली काढली. या अभियानात एकूण ६८३ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ४३५ उत्पन्न दाखले, ६५ शिधापत्रिका दाखले तसेच ४५ रहिवासी दाखल्यांचा समावेश आहे.अभियानादरम्यान प्रलंबित असलेली एकूण ७५ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच ७/१२ मधील दुरुस्ती संदर्भात ५२ अर्ज प्रशासनाने स्वीकारले.महसूल विभागाच्या एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत प्राप्त झालेले ८६ अर्ज तत्काळ निकाली काढण्यात आले

डिजिटल उताऱ्यांचे वितरण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ६१ डिजिटल ७/१२ तसेच ६१ ‘८-अ’ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.‌ एकाच ठिकाणी महसूल, कृषी, पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या विविध योजना व दाखल्यांचा लाभ सहज उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. शासकीय सेवा जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या या महाराजस्व अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

प्रशासन- शासन निर्णयाची गांभीर्याने दखल घेत नसल्याने दलित आदिवासीभुमिहिन कास्तकारांचे बळी- अ‍ॅड. भास्कर मगरे..अन्यथा पाचही विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार- अ‍ॅड.मगरे- राजुरात दलित आदिवासी भुमिहिन कास्तकार, बेघर निराधारांचा मेळावा संपन्न..

vishwatmaklokswamivarta

निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न- ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ नानासाहेब पाटील यांनीही केले मोलाचे मार्गदर्शन- निर्यात वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची पाडळीत सुरवात

कल्याणमध्ये हजारोंच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा,योगाद्वारे मन आणि शरीर सुदृढ ठेवा : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट  बसला आग, कोणतीही जीवितहानी नाही