vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण, तसेच विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती या मासिकातून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.

पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती झाली असून आतापर्यंत या मासिकाचे ११ अंक प्रसिद्ध झाले आहेत. या मासिकामध्ये राज्यातील विविध भागातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी यशोगाथा, आधुनिक शेळीपालन, कुक्कुटपालन, गो-आधारित शेती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, लसीकरण मोहिमा, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय दौरे व उपक्रम यांच्या माहितीचा समावेश असतो. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाबरोबरच आता हे मासिक महाविस्तार ॲपमध्येही वाचता येणार आहे.

“पशुपालन व दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विभागामार्फत प्रकाशित होणारे हे मासिक पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना व यशस्वी प्रयोगांची माहिती देणारे प्रभावी साधन आहे. महापशुधन वार्ता हे डिजिटल ई मासिक पशुपालक शेतकरी बांधवांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. प्रत्येक पशुपालक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचावे,” असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

 

#महापशुधनवार्ता

संबंधित पोस्ट

गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता**मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22 हजार 611 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता*

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जात वैधता प्रमाणपत्रे अनाधिकृत आढळल्यास कायद्यानुसार फौजदारी कारवाई, शिक्षा…