vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये नवनीत फाऊंडेशनच्या वतीने अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांकरिता इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत दोन दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये 105 शिक्षक सहभागी झाले होते. दरवर्षी शिक्षकांचे सक्षमीकरण व अध्यापन गुणवत्ता वाढवण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या पुढाकारातून या प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असते.

सदर कार्यशाळा नवनीत फाऊंडेशनचे संचालक श्री. अनिलभाई गाला यांच्या सहकार्याने तसेच फाऊंडेशनच्या शिक्षक प्रशिक्षण विभाग प्रमुख श्रीम. बसंती रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना शिक्षक प्रशिक्षण विभागाच्या सल्लागार डॉ. भारती हजारी यांनी स्कॉलरशिप परीक्षेबाबत प्रभावी व दर्जेदार अध्यापन करणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना येणाऱ्या समस्या याबाबत माहिती दिली. श्री. विनय वर्तक व श्री. लक्ष्मण कुंभार या तज्ज्ञांनी गणित, बुद्धिमत्ता व मराठी विषयांचे मार्गदर्शन केले.

 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी काही क्लृप्त्या, परीक्षा पद्धती, महत्त्वाचे घटक, कमीत कमी वेळात उत्तर शोधणे याविषयी दोन्ही तज्ज्ञांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांच्या समस्यांचे व शंकांचे निराकरण करण्यात आले. या विषयाकडे बारकाईने लक्ष देण्याच्या दृष्टीने पीपीटीद्वारे सादरीकरण करून शिक्षकांनाही या विचारविनीमयात सहभागी करून घेण्यात आले होते.

प्रशिक्षण वर्ग उत्तम झाल्याबाबत प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नमुंमपा शिक्षण अधिकारी श्री. अशोक कडूस यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे व्यवस्थापन विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी केले. नवनीतचे ठाणे विभागाचे व्यवस्थापक श्री.चेतन नलावडे तसेच सिद्धेश भिंगारे, प्रेरणा मयेकर, रूपाली शेट्ये, अविनाश गोळे या सहकाऱ्यांचे प्रशिक्षणाच्या आयोजनात विशेष सहकार्य लाभले.

0000

संबंधित पोस्ट

कराटे योद्धा एसोसिएशनच्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयात विनंती अर्ज बीड सत्र न्यायालयाने  अर्ज फेटाळला

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.