vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई प्रतिनिधी : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने ३८ अंगणवाड्या सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी मान्यता दिलेल्या १४५ अंगणवाड्या बांधून पुर्ण झाल्या असून, या अंगणवाड्यांच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील बालके आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार व आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या अभियानाच्या माध्यमातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. अतिदुर्गत भागात अंगणवाडी सुरू करण्यासाठी लोकसंख्येचे निकष शिथिल करण्यात आले असून, १०० लोकसंख्या असलेल्या भागात अंगणवाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अंगणवाड्यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत राज्यातील दुर्बल आदिवासी गटात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ३८ अंगणवाडी केंद्रात एक अंगणवाडी सेविका, एक मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या हिश्यातून मानधन, प्रशासकीय खर्च, पोषण आहार, अंगणवाडी भाडे, गणवेश प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी बांधलेल्या १४५ आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या ३८ अशा एकूण १८३ अंणवाड्या गडचिरोली, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे, यवतमाळ या जिल्ह्यात सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली..

0000

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक आज दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांवर निर्बंध घालण्यासाठी सक्षम कायदा करावा.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाचा 24×7 कार्यरत नियंत्रण कक्ष

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध

vishwatmaklokswamivarta