vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी : सन 2025-26 अंतर्गत गोशाळेला अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करण्यास शासनाने दिनांक 15 जून 2025 पर्यंत मुदत दिली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत पात्र गोशाळा, गोसदन आणि गोरक्षण संस्थांनी 15 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन, प्रति गायीस 50 रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या 8 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयातील नमुद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन संकेत स्थळावर करावे.

 सांगली जिल्हयातील जास्तीत जास्त गोशाळा, गोरक्षण संस्थांनी देशी गायी पालन परिपोषण अनुदान योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचा प्रथम टप्पा माहे एप्रिल 2025 ते माहे सप्टेंबर 2025 या सहा महिन्यांकरीता असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

ऐतिहासिक #सातारा नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र,पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्याकरिता“समता पंधरवडा” विशेष मोहिम सुरु

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर