vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्याकरिता“समता पंधरवडा” विशेष मोहिम सुरु

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्याकरिता“समता पंधरवडा” विशेष मोहिम सुरु

 

रायगड प्रतिनिधी :- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळावे, याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.01 एप्रिल ते दि.15 एप्रिल 205 या कालावधीत “समता पंधरवडा” ही विशेष मोहिम सुरु असून याचा लाभ मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांन केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम राबविणेत येत आहे. इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या, तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बरेचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते.

वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा, तसेच, जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु, अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाहीं अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी.

००००००

संबंधित पोस्ट

कुळगाव बदलापूर नक्शा प्रकल्प

vishwatmaklokswamivarta

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा* अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने