vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जावळी तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

जावळी तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

सातारा प्रतिनिधी: इंधनपुरवठ्याबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे, असे आवाहन जावलीचे तहसीलदार यांनी केले आहे.

यासंदर्भात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच संबंधित गॅस एजन्सी व पेट्रोल पंप वितरकांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या भेटीत तालुक्यातील इंधनपुरवठा सुरळीत असल्याची माहिती घेण्यात आली.

तहसीलदार प्रवीण मुदगूल यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे अधिकारी शितल चहांदे यांनी तालुक्यातील गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांची पाहणी केली. यावेळी संबंधित वितरकांनी पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. गॅस कंपन्यांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग व केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून पहिला सिलेंडर घेतल्यानंतर 45 दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही, अशी प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच बुकिंग करणे आवश्यक आहे. नागरिकांनी पेट्रोल पंप व गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅसचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी या कारणावरून वाद घालु नये, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, इंधन टंचाई व घरगुती एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार जावळी तालुक्यात घरगुती गॅसच्या अनधिकृत वापरावर आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

तहसीलदार प्रविण मुदगुल यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथके स्थापन करण्यात आली असून हॉटेल, आस्थापना किंवा औद्योगिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्यास अचानक तपासणी करून सिलेंडर जप्त करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. घरगुती गॅसचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करावा. गॅसचा अवैध साठा किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालय किंवा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुरवठा अधिकारी चहांदे यांनी केले. तसेच गॅसची बचत होईल अशा पद्धतीने वापर करावा आणि सौर किंवा विद्युत उपकरणांचा वापर करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

000

संबंधित पोस्ट

10 नोव्हेंबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

vishwatmaklokswamivarta

जनतेला शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळेल याची खबरदारी घ्या – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना आज सोमवारी प्रसिद्ध*  *हरकती अथवा सूचना २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात*

महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका..

vishwatmaklokswamivarta