vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा- उपसंचालक प्रवीण टाके

बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा- उपसंचालक प्रवीण टाके

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- बदलत्या माध्यमविश्वात पारंपरिक पत्रकारितेसोबत डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. पत्रकारांनीही आता सोशल मीडिया व नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. माहिती व जनसंपर्क विभागही बदलत्या माध्यम व्यवस्थेनुसार आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत आहे, असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले छत्रपती संभाजीनगर विभागाचे नवनियुक्त उपसंचालक प्रवीण टाके यांची बुधवारी (दि.२) पत्रकार, संपादकांनी भेट घेतली. त्यानिमित्त दुपारी ४ वा. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संवाद साधला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहायक संचालक सुरेश पाटील, माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांच्यासह विविध दैनिके, साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.

 नव्याने रुजू झालेले उपसंचालक प्रवीण टाके तसेच सहायक संचालक सुरेश पाटील व माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना आपली ओळख करून दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी सर्व संपादक पत्रकारांचे स्वागत केले. तसेच पत्रकारांचा परिचय करुन दिला.स्थानिक स्तरावरील पत्रकारांच्या समस्या यावेळी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या

 उपसंचालक प्रवीण टाके म्हणाले की, डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. पत्रकारांनी डिजिटल माध्यमांचे आव्हान स्वीकारून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा.पत्रकारांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या समस्या, दैनंदिन अडचणी सोडवण्यास प्रशासनाचा प्राधान्य क्रम राहील,असेही त्यांनी सांगितले.माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित कॉफी टेबलबुक ऑनलाईन उपलब्ध

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

vishwatmaklokswamivarta

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..