vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

 

 सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी, 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला तसेच दि. 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव आगमन व विसर्जन मिरवणुकांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्पी व प्रेशरमिडचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. याच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून सदर वाहन मिरवणुकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत मिरवणुकी दरम्यान प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजीचे सकाळी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजीचे 23.59 या वेळेत गोपाळकाला, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने मिरवणुकीत / कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी, मार्गावर, रस्त्यावर, कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, सार्वजनिक मंडळे किंवा गणेश मंडळे यांना तसेच गणेशोत्सव इतर सणांच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, सदस्य तसेच वाद्य मालक, चालक, व्यवस्थापक अथवा ताबाधारक यांनी प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्पी व प्रेशरमिड यांचा वापर करणार नाही अथवा उपयोगात आणू नये म्हणून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 163 प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार,- शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा- ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे लोकार्पण

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी

vishwatmaklokswamivarta

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन