vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी घेतला नमुंमपा कामकाजाचा आढावा..

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी घेतला नमुंमपा कामकाजाचा आढावा..

       नवी मुंबई प्रतिनिधी-   महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी नवी मुंबई महानगरपालिका येथे भेट देत सफाई कामगारांच्या विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

  नवी मुंबई महानगरपालिकेत यांत्रिकी पध्दतीने मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई आधीपासूनच केली जात असून दूषित गटारांमध्ये एकाही कामगाराचा मृत्यू झालेला नाही तसेच स्वच्छतेबाबत नवी मुंबईेचे कामही इतरांनी अनुकरण करावे असे असल्याचे मत उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी व्यक्त केले.

     सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत आयोग सकारात्मक काम करीत असून शासन मंजूरीशी संबंधित बाबींवर आयोग प्रभावीपणे पाठपुरावा करील असे ते म्हणाले पंचवीस वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या सफाई कामगारांना मोफत सदनिका देण्याबाबतच्या शासन निणर्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सिडकोकडे जागा उपलब्धतेसाठी आयोगामार्फतही प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

    यावेळी सफाई कामगारांच्या संघटना व सफाई कामगारांशी चर्चा केल्यानंतर संघटनांनी उपाध्यक्षांकडे दिलेल्या निवेदनास अनुसरुन त्यांनी मागणी केलेल्या विषयांबाबत महापालिका प्रशासनाने एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल असेही उपाध्यक्षांनी प्रत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. पुढच्या दौऱ्यात

     सफाई कामगारांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेत सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोग कटीबध्द असून त्यादृष्टीने कार्यवाही करीत असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्र राज्य सफाई आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी धुलाई भत्ता व घाण भत्ता यामध्येही वाढ करावी असे सूचित केले.

  आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे यांनी आयोगाचे उपाध्‍यक्ष श्री.मुकेश सारवान यांचे स्वागत केले. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री.भागवत डोईफोडे, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, परिमंडळ 1 उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे व इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते

0000

संबंधित पोस्ट

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन आज होणार साजरा, मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता होणार ध्वजवंदन

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत