vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित* 

*मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित*

सातारा, प्रतिनिधी : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदी व घरकुल बांधणी अर्थसाह्याचा पहिला हप्ता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते वितरित करण्यात आले.यावेळी वासोळे व कोंढावळे येथील लाभार्थीना जमीन खरेदी अर्थसहाय्य तसेच पाचवड येथील शासकीय जमीन दिलेल्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आला

प्रधानमंत्री जनमन योजना ही आदिवासी व वंचित घटकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना असून, त्याअंतर्गत कातकरी समाजातील नागरिकांना घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरविले जात आहे. जागा नसलेल्या या 22 कातकरी लाभार्थ्यांना पाचवड येथे शासकीय जागा उपलब्ध करण्याचे काम तत्कालीन प्रांताधिकारी श्री राजेंद्र कचरे, तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी आणि तालुका भूमी अभिलेख श्री. साठे यांनी मंत्रिमहोदयांच्या मार्गदर्शनाखाली केले.

 वंचित समाजासाठी मी नेहमीच कार्यरत राहीन असेही मंत्री श्री. पाटील यावेळी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आणि प्रकल्प संचालक श्री. विश्वास सिद यांचे पंचायत समिती वाईला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

 कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट, विस्तार अधिकारी श्री. शाम राठोड, उमेश भिसे, श्रीमती प्रीतम ओंबळे, पाचवडचे सरपंच महेश गायकवाड यांच्यासह कातकरी लाभार्थी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद..

नांदेड भक्तिमय ; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात  लाखो भाविक नतमस्तक

vishwatmaklokswamivarta

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

vishwatmaklokswamivarta

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर.