vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीची जाहीरात क्रमांक आस्था/ 01 / 2025, दिनांक 27/03/2025 रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

 महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. 20 मे, 2011 अन्वये जे उमेदवार इ. 10 वी / 12 वी (माध्यमिक / उच्च माध्यमिक परीक्षा ) न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विदयापीठ, ज्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता प्राप्त आहे, अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणा-या उमेदवारांना लिपीक-टंकलेखक व लेखा लिपीक या पदांकरीता अर्ज करण्यात यावा याकरीता तरतूद करण्यात येत आहे.

सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपीक-टंकलेखक व लेखा लिपीक या संवर्गाकरिता तसेच जाहिरातीतील इतर सर्व संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 19/05/2025 (वेळ रात्री 11.55) पर्यंत वाढविणेबाबत तरतूद करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा आता २३ मार्च रोजी

लघु उद्योजकांसाठी पुरस्कार; ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

उमेद अभियानामुळे बेलगावातील महिलांना आर्थिक बळ ! झाडू निर्मितीतून मिळवले स्वावलंबन

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा 

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 2 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी …

vishwatmaklokswamivarta