vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा आता २३ मार्च रोजी

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा आता २३ मार्च रोजी

राज्य प्रतिनिधी-

सैनिक कल्याण विभाग तसेच विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमधील लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदांसाठी आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

टी.सी.एस. आयओएन मार्फत होणारी ही परीक्षा पूर्वी दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी पोलीस भरती परीक्षा असल्याने सदर परीक्षा आता दिनांक २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.

उमेदवारांनी संबंधित दिवशी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे तथा उपसंचालक (सैनिकीकरण), सैनिक कल्याण विभाग, लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (नि.) यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न- ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ नानासाहेब पाटील यांनीही केले मोलाचे मार्गदर्शन- निर्यात वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

​भारतीय अन्न महामंडळाकडून महाराष्ट्रात खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) तांदूळ विक्रीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन