vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात अलीकडील नैसर्गिक आपत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे दोन वर्ष नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पर्यंत तात्काळ कृषी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे,असे जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी कळविले आहे.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे, खत, औषधे तसेच शेतीसंबंधित इतर आवश्यक खर्चासाठी त्वरित कर्ज मिळणार आहे. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळेल. पूर किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जाईल. जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील बँकेच्या सर्व ग्रामीण व अर्ध-शहरी शाखांमधून अर्ज करण्याची सुविधा. सर्व शाखांना तात्काळ कर्ज मंजुरी चे अधिकार दिले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भेट द्या,असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप.

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta