vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

 

रायगड-अलिबाग प्रतिनिधी-:- लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे. सध्या 22 हजार 375 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. याकरिता लाभार्थी महिलांना तात्काळ https://ladakibahin.maharashtra.gov.in, या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दि.31 मार्च 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

तालुकानिहाय प्रलंबित ई-केवायसी प्रकरणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग- 2 हजार 633, कर्जत-1 हजार 962, खालापूर- 1 हजार 772, महाड- 1 हजार 656, माणगाव- 1 हजार 799, म्हसळा-808, मुरुड-713, पनवेल-5 हजार 140, पेण-1 हजार 533, पोलादपूर- 427, रोहा-844, श्रीवर्धन- 787, सुधागड-पाली-489, उरण-1 हजार 376, तळा-436.

 महाराष्ट्र शासनाची “लाडकी बहीण” योजना सन 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण, स्वावलंबन वाढविणे व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

तसेच ई-केवायसी करताना अडचणी येत असल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेंतर्गत मिळणारा लाभ बंद होऊ शकतो, याची लाभार्थींनी नोंद घ्यावी.

000000

संबंधित पोस्ट

छठ पूजेनंतर प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे सज्ज, सणासुदीनंतर कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांकरता 6,181 विशेष गाड्या

vishwatmaklokswamivarta

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जनसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर निवेदने प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

vishwatmaklokswamivarta

उत्तर सिक्कीममधील भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने बचावकार्य जोरदार सुरू ठेवले आहे. ११३ पर्यटक सापडले, ३० हवाईमार्गे सुटकेत,

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…