vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर सिक्कीममधील भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने बचावकार्य जोरदार सुरू ठेवले आहे. ११३ पर्यटक सापडले, ३० हवाईमार्गे सुटकेत,

उत्तर सिक्कीममधील भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने बचावकार्य जोरदार सुरू ठेवले आहे. ११३ पर्यटक सापडले, ३० हवाईमार्गे सुटकेत..

 

राज्य प्रतिनिधी

उत्तर सिक्कीममधील भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने बचावकार्य जोरदार सुरू ठेवले आहे. ११३ पर्यटक सापडले, ३० हवाईमार्गे सुटकेत,

सिक्कीममध्ये पावसामुळे भीषण विध्वंस झाला आहे. सिक्कीममधील अनेक भाग पावसामुळे भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले आहेत. लाचुंग आणि चुंगथांगमध्ये १,६७८ पर्यटक अडकले होते, त्यांना बचावकार्य राबवून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहर काल मंगण जिल्ह्यातील छातेन येथे एका लष्करी छावणीत भूस्खलन झाले, ज्यात ३ जवानांचा मृत्यू झाला आणि ६ जण बेपत्ता आहेत. पण लाचुंगमध्ये अजूनही १०० हून अधिक लोक अडकलेले आहेत.

भूस्खलनामुळे रस्ते बंद-पोलीस महासंचालक (डीजीपी) अक्षय सचदेवा यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले की, काही पर्यटकांना तेथून बाहेर काढून गंगटोकमध्ये नेण्यात आले आणि लाचेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे मंगण जिल्ह्यात भूस्खलन झाले. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले.

जवानांचा मृत्यू आणि ६ जणांचा शोध सुरूछातेनमध्ये ज्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, त्यांची नावे लखविंदर सिंग, लान्स नाईक मुनीश ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लखडा अशी आहेत. तर लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. ६ बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे.

 

संबंधित पोस्ट

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….

विधानसभा लक्षवेधी:सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई- वनमंत्री गणेश नाईक