vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत सांगितले.विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले फ़ुलशेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान,काढणीपश्चात प्रशिक्षण, हरितगृहातील आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र बाजारात कृत्रिम फुले येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासह पर्यावरण विभागासोबत अधिवेशनकाळातच बैठक घेऊन यावर नियंत्रणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही श्री. गोगावले यांनी यावेळी सांगितलेसदस्य कैलास पाटील(घाडगे), नारायण कुचे यांनी या लक्षवेधीमध्ये सहभाग घेतला.

0000000

संबंधित पोस्ट

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार

vishwatmaklokswamivarta

राज्यातील नाशिक रेड अलर्ट-आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta