vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    सांगली, प्रतिनिधी) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 17 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत

      या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

        हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 17 सप्टेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

संबंधित पोस्ट

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उद्‌घाटन दालनात १५० वर्षांमधील निवडक छायाचित्रे व दस्तावेजांचे प्रदर्शन

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*