vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

जालना/प्रतिनिधी,ज्यांच्याकडे कन्यारत्न जन्माला आलेले आहे, त्याला कशाही कमी भासत नाही. म्हणतात ना पहिली बेटी और धन की पेटी… असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, पहिली बेटी ही खरोखरच धन की पेटी असते. मुलगी जन्माला आली की आपण बँक बँलन्स वाढवायला सुरुवात करतो. म्हणूनच म्हटले की, पहिली बेटी और धन की पेटी! श्रीकृष्ण जन्माचे गोडवे आज श्री. जोशी महाराजांनी गायिले. यावेळी त्यांनी पाळणा आणि भजनं देखील गायिले.

कीर्तन सेवेत आज हभप श्री राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांनी जग्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या अंभगावर निरुपन केले. भक्ती ते नमन । वैराग्य तो त्याग॥ ब्रम्ही भोग, ब्रम्हा तनु, देहाचे निरासने पाहिजे या ंठाया, माझी ऐसी काया॥ या अभंगावर निरुपन करतांना ते म्हणाले की, साधक भक्ती करतो, त्याच्या सेवेसाठी आहे म्हणून! भक्ती म्हणजे नमन! अर्थात भक्ती ही नम्रता आहे म्हणून ती सर्वश्रेष्ठ मानली आहे. संतांची दृष्टी सुध्दा अशीच होती. नम्रता हा भाव प्रत्येकांच्या ठायी- ठायी असावा, असेही ते म्हणाले.

यावेळी विश्वस्त मंडळचे सचिव श्री संपतराव पाटील, मंडळाचे इतर पदाधिकारी व कॉलनी सर्व भाविक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-2026पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य…

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*  

जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन- पशुधन चारा, बियाणे, कृत्रिम रेतनासाठी डीपीसीतून निधी