vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

        अमरावती, प्रतिनिधी: मेळघाटच्या दुर्गम भागातील तरुणांमध्ये जिद्द आहे. या तरुणांनी आता केवळ स्थानिक रोजगारावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगारासाठी सज्ज व्हावे. प्रशासकीय यंत्रणा तुमच्या पाठीशी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार केवल कुमार काळे यांनी केले.

    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि सिपना कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच चिखलदरा येथे संपन्न झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी श्री. काळे बोलत होते.     यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर, सुभाष गुल्हाने, प्रा. कान्हू , पंकज कचरे तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

      या मेळाव्यात बी.व्ही.जी. इंडिया, नवभारत फर्टिलायझर, सनलाईट सोलर आणि प्रेसिजन मार्चिग यांसारख्या ८ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 255 रिक्त पदांसाठी 346 उमेदवारांनी नोंदणी केली. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 142 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 2 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

  सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात धारणी आणि चिखलदरा भागातील उमेदवारांसाठी रोजगार मेळावे घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कान्हू यांनी तर आभार प्रा. ढगे यांनी मानले.

 

00000000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर येथे दिनांक 8 डिसेंबरपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील कृषी सेवा केंद्रांवर साठा व दर दर्शविणारे फलक अनिवार्य.राहाता तालुक्याची खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक संपन्न

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण 

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta