vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन

 

राज्य प्रतिनिधी- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” (CRT) बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माहे एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक गावातील किमान ३०-४० शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशनद्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाणार आहे.सदर शेती शाळा चार भागात घेतली जाणार असून त्याबद्दलचा तपशील नियोजित दिनांकासह खालील प्रमाणे आहे. भाग १- पेरणीपूर्व तंत्रज्ञान: बेड तयार करणे, बेडवर टोकन करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया- दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी नियोजित.भाग २- जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन: बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन. नियोजित दिनांक ८ एप्रिल २०२६.भाग ३- एकात्मिक कीड व्यवस्थापन: सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक,

लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. नियोजित दिनांक १५ एप्रिल २०२६.भाग ४- भात शेतीचे लागवड तंत्र : भाताची थेट पेरणी, श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत. नियोजित दिनांक २२ एप्रिल २०२६.  या शेतीशाळेस कृषि विभागा अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी ४०-५० शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.उपरोक्त शेती शाळा नियोजित दिनांका दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळेची लिंक गाव निहाय शेतकरी यांचे व्हॉअसअपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे कृषी अधिक्षक कृषी कार्यालयाने कळविले आहे. 00000

संबंधित पोस्ट

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

जागतिक पाणथळ दिनानिमित्त टीएस चाणक्यमागील सागरी किनाऱ्यावर लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम

vishwatmaklokswamivarta