vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

ठाणे प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि.११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दि.२१ फेब्रुवारी २०२५ ते दि.१७ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
१) ९०११३०२९९७, २) ८२६३८७६८९६, ३) ८७६७७५३०६९, ४) ७३८७४००९७०, ५) ९९६०६४४४११
६) ७२०८७७५११५, ७) ८१६९२०२२१४, ८) ९८३४०८४५९३, ९) ८३२९२३००२२, १०) ९५५२९८२११५.
वरील भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८-०० ते रात्री ८-०० या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ, पुणे-०४ सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी कळविले आहे.00000000000

संबंधित पोस्ट

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना”ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधारसांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया;पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

कृपया प्रसिद्धिसाठी -युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य,करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !* सनातन संस्थेच्या आश्रमात श्री ललिता त्रिशती पूजन !

vishwatmaklokswamivarta

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी. 

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित..

vishwatmaklokswamivarta