vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृपया प्रसिद्धिसाठी -युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य,करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !* सनातन संस्थेच्या आश्रमात श्री ललिता त्रिशती पूजन !

कृपया प्रसिद्धिसाठी -युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य,करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !* सनातन संस्थेच्या आश्रमात श्री ललिता त्रिशती पूजन !

 

राज्य प्रतिनिधी -फोंडा, (गोवा) – भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह देश-विदेशातील साधक आणि समस्त धर्मप्रेमी यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ३५ पुरोहितांद्वारे शतचंडी याग पार पडला. शतचंडी याग चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याविषयी आणि सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत रहावे, यांसाठी २२ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘श्री ललिता त्रिशती देवी’ची पूजा भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. या पूजेत तमिळनाडू येथील श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य, श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी त्रिपुरासुंदरी त्रिशती देवीची नावे उच्चारत पुष्पार्चना केली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पूजेचे यजमानपद भूषवले. या वेळी सनातनचे उपस्थित संत आणि साधक यांनी पूजेच्या संकल्पपूर्तीसाठी श्री ललितादेवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

शतचंडी यागात आद्यहोम, सप्तशती पारायण, कन्यापूजन, सुवासिनी पूजन, ब्रह्मचारी पूजन, दांपत्य पूजन, गोपूजन या धार्मिक विधीनंतर पूर्णाहुती आदी धार्मिक विधी झाले. १०० पाठांचा जप आणि १० पाठांचे हवन करण्यात आले. श्री ललिता त्रिशती देवीची पूजा ललितादेवीची कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी केली जाते. या पुजेतून सैनिक, साधक आणि धर्मप्रेमी यांच्या शरीरासह, मन, बुद्धी आणि सूक्ष्म देह यांभोवती संरक्षण कवच निर्माण व्हावे, यासाठी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.श्री. अभय वर्तक,प्रवक्ता, सनातन संसंस्था

00000

 

संबंधित पोस्ट

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

संकल्पशील आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या संकल्पनेतून तळणी येथे पार पडली महिलांना बचत गटातून स्वावलंबी बनवण्याची मार्गदर्शनपर बैठक…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta