vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

 

राज्य प्रतिनिधी -बुलडाणा: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी दि. 26 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिंकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (माहिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन निर्णय दि.29 डिसेंबर 2023 व दि. 25 जानेवारी 2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली-2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावा. ही लिंक दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत सुरु राहिल. तसेच अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येत आहे.0000

संबंधित पोस्ट

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. 

vishwatmaklokswamivarta

कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना“वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत१०० लाख रुपयांचा निधी मंजूर,विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta