vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकाभिमुख प्रशासन, अबाधित कायदा व सुव्यवस्थेस प्राधान्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे

लोकाभिमुख प्रशासन, अबाधित कायदा व सुव्यवस्थेस प्राधान्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

        सांगलीl) प्रतिनिधी: जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणतानाच लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न असतील. तसेच, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे (भा. प्र. से.) यांनी  येथे दिली.

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (भा. प्र. से.) यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. आपणास सांगलीतील कामाचा पूर्वानुभव असून, जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात अधिक चांगले काम करू, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे सारथी, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे हे सन 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. श्री. अशोक काकडे यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक या पदांवर काम पाहिले आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सन 2003 ते 2006 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली या पदावर काम केले असून, सांगलीतील दुष्काळ, महापुराच्या आठवणी व त्यावेळी केलेल्या सर्वोत्तम कामांच्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान देशभरातील ८२ शिक्षक सन्मानित

vishwatmaklokswamivarta

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा ‘क्रीडाकुंभ’ राज्यभरातील अधिकारी – कर्मचारी दाखवणार खेळाचे कौशल्य७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी – शिर्डीत क्रीडा स्पर्धांचा थरार ; तयारी अंतिम टप्प्यात…

vishwatmaklokswamivarta

समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta