vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा- मंत्री अतुल सावे

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा- मंत्री अतुल सावे

मुंबई, प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शासकीय योजना, विविध सवलती, शिक्षण, नोकरी तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, दिव्यांग कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल, उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी विभागामार्फत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून दिव्यांगांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत दिव्यांग शाळांमध्ये सुधारणा, रिक्त पदांची तत्काळ भरती, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महानगरपालिकेच्या मार्फत दिव्यांगासाठीच्या राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली

000000

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठीउप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर…

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू’- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta