vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी-एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी-एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई, प्रतिनिधी: राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व उपनगर मध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघर मध्ये एक, नागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मी रोजी सकाळपर्यंत ) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस झाला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २९ मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे जिल्ह्यात २९.५, रायगड २१.९, रत्नागिरी १०.१, सिंधुदुर्ग १३, पालघर ३.१, नाशिक २६.३, धुळे १५.९, नंदुरबार ५.२, जळगाव ३.२, अहिल्यानगर ४.३, पुणे ४.८, सोलापूर ५.७, सातारा ३.९, सांगली १.६, कोल्हापूर ०.७, छत्रपती संभाजीनगर २.८, बीड १, लातूर २.१, धाराशिव ९.७, परभणी ०.१, हिंगोली ०.१, यवतमाळ ०.१, वर्धा ४.७, नागपूर २०.८, भंडारा १.७, गोंदिया ५, आणि गडचिरोली ०.९.

दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्ती, पालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत झाली आहे. मुंबई उपनगर येते झाड पडून दोन, पुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात २६ प्राणी , वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. तसेच मुंबई काळाचौकी येथे भारत आइस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन वायू गळती थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना उद्या नियुक्तीपत्रे प्रदान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार,राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद   – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट- मिरजमधील दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे लोकार्पण

जागतिक महिला दिन ८ मार्चसाठी विशेष लेख  महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर