vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित…

 

मुंबई, प्रतिनिधी  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित केला आहे. याबाबत आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

आयोगाने २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे २०२७ पासून या परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र विविध उमेदवारांकडून प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने (ओएमआर) आधारीत घेण्यासंदर्भात प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित (सीबीटी) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचा निर्णय जुलै, २०२७ पर्यंत स्थगित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक,उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.संपर्क समन्वय योजना तयार करुन आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश…

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta