vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

            सांगली, प्रतिनिधी : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 6 ऑक्टोबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

  या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

        हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

विदर्भातील पूरस्थितीचा आढावा-मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश- मंत्री गिरीश महाजन

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना…

महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा राजस्थान व ओडिशाचे राज्याच्या विकासात देखील मोठे योगदान..’पधारो म्हारो देस : राज्यपालांकडून रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील  विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित सचिव तुकाराम मुंढे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta