vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्राने दूरदृष्टी नेतृत्व गमावले-अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय शोकसभेत श्रद्धांजली

महाराष्ट्राने दूरदृष्टी नेतृत्व गमावले-अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय शोकसभेत श्रद्धांजली

———————————————-

जालना प्रतिनिधी- शिस्तप्रिय व रोखठोक बोलणारा तसेच समाजहित जपणारा नेता म्हणून ओळख असलेले अजितदादा पवार यांच्या सारखे दूरदृष्टी नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असल्याची भावना आज( दि. 29)सर्व पक्षीय नेतेमंडळींनी व्यक्त केली.

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहात आयोजित सर्व पक्षीय शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे होते. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भास्कर अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख. महेमूद , राजेश राऊत , रिपाइं नेते ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, कामगार नेते अण्णा सावंत, काॅंग्रेसचे राजेंद्र राख, कल्याण दळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, रशीद पहेलवान आदींची प्रमुख उपस्थिती होती

   यावेळी बोलतांना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अजितदादा पवार हे कठोर परिश्रम करणारे नेते होते, आज राजकारणात कठोर परिश्रम करणारे नेते राहिले नाहीत, स्पष्टवक्तेपणा व शिस्त बाळगणारे नेते म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती, १९९०-९५ दरम्यान विधीमंडळात आपला त्यांच्याशी संपर्क आला, दूरदृष्टी नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख राहील, त्यांच्या अनेक आठवणी आपल्या सदैव स्मरणात राहील, असे सांगत अजितदादा पवार यांच्या काही आठवणी त्यांनी नमूद केल्या.

    यावेळी बोलतांना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, अजितदादा पवार आणि आपला 35 वर्षांचा संबंध होता, अजितदादा पवार यांच्या सारखा प्रशासकीय यंत्रणेवर कमांड ठेवणारा दुसरा नेता आपण बघितला नाही, थोरल्या पवार साहेबांचे संस्कार घडल्याने ते शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले गेले, वक्तशीरपणा, विकासाचा दृष्टीकोन, पक्ष नेतृत्वाला सभागृहात जाब विचारणारा नेता म्हणून अजितदादा पवार हे ओळखले गेले, त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून नवीन पिढीला त्यांचे विचार हे प्रेरणादायी ठरतील, असे आमदार खोतकर म्हणाले.

     सर्व राजकीय नेते मंडळींना हवे हवेसे वाटणारे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती, सर्व समाजाविषयी नितांत प्रेम असणारे नेते म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार हे विधीमंडळाचे कामकाज सहजपणे हाताळत असे, महाराष्ट्र एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास पोरका झाला असल्याची भावना आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

     आमदार नारायण कुचे यावेळी बोलतांना म्हणाले की, सत्ता असो वा नसो अजितदादा पवार यांनी स्पष्टवक्तेपणा व शिस्त कायम ठेवली, त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

     यावेळी बोलतांना कैलास गोरंट्याल म्हणाले की, अजितदादा पवार यांनी जालना शहराच्या पाणी प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले, जालना शहरातील क्रीडा संकुलासाठी वाढीव निधी उपलब्ध करून दिला अजितदादा पवार हे जालनेकरांच्या सदैव आठवणीत राहावे, यासाठी जालना शहरातील महत्त्वाच्या चौकास, रस्त्यास महानगर पालिकेने त्यांचे नाव द्यावे, अशी सूचनाही गोरंट्याल यांनी यावेळी केली.

    यावेळी बोलतांना भास्कर अंबेकर म्हणाले की, जालना शहरातील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न अजितदादा पवार यांनी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या विकास प्रश्नांवर त्यांचे लक्ष राहिले, त्यांच्या निधनामुळे एक कर्तबगार नेतृत्व हरपले असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

    यावेळी आपली भावना व्यक्त करतांना अरविंद चव्हाण म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे एक झंझावात नेतृत्व शांत झाले आहे, आपल्या राजकीय जडणघडणीत मोलाचा वाटा आहे, अजितदादा पवार यांच्यामुळेच आपण घडलो,आपल्याला सर्वोच्च स्थानावर बसविण्यात दादांचा मोठा वाटा आहे. सदैव सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणारे अजितदादा पवार यांनी जालना जिल्ह्यातील विकास प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. बंद पडलेला जालना साखर कारखाना सुरू करण्यासाठी अजितदादा पवार यांनी महत्त्वाची भूमिका घेत ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामे करणारे नेतृत्व आपल्यातून निघून गेले असले तरी अजितदादा पवार यांच्या अनेक आठवणी जालनेकरांच्या सदैव स्मरणात राहतील, असे ते म्हणाले.

    अजितदादा पवार हे विकासाचा दृष्टीकोन ठेवणारे कर्तबगार नेते होते, उपेक्षित समाज घटकांच्या विकासाचा विचार करणारे रोखठोक नेतृत्व हरपले असल्याची भावना यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी व्यक्त केली. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले असून फुले-शाहू- आंबेडकर चळवळीला बळ देण्याची भूमिका अजितदादा पवार यांनी सातत्याने घेतली असल्याची भावना यावेळी ॲड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी व्यक्त केली. स्पष्टवक्तेपणा व स्वच्छतेची आवड असणारे नेते म्हणून अजितदादा पवार यांची ओळख कायम राहील, अशी भावना यावेळी भास्कर दानवे यांनी व्यक्त केली. कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द देवून तो पाळणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ख्याती होती, विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम करणारा नेता हरपला असल्याची भावना अण्णा सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती, त्यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना राजेंद्र राख यांनी व्यक्त केली.

     यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनित सहानी यांनीही आपल्या भावना व्यक्त करून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

   यावेळी अण्णासाहेब चित्तेकर, अन्वर मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, आतिकखान, श्रीमती शंकुतला कदम, , मंगल ताई पाटील , रिकंल तायड , बदर चाऊस, शितल ताई बारोटे , सगीर अहेमद, नितीन जेथलिया,सुनील आर्दड , राम सावंत, शाह आलमखान,राजेंद्र गोरे, बाला परदेशी, संजय दाड , प्रा. सोपानराव तेलगड , साईनाथ चिन्नादौरे , विरेंद्र धोका, वसंत जाधव , संजय इंगळे , शरद देशमुख , सिद्धीविनायक मुळे, संतोष ढेंगळे , कृष्णा पडुळ , अविनाश कव्हळे , प्रभाकर घेवंदे , सतीश वाहुळे , कैलास मगरे , महेंद्र रत्नपारखे , महेश निकम, जीवन सले, शिवराज जाधव, संजय देठे,जावेद अली, नारायण वाडेकर , झहिर बिल्डर , इमरान बिल्डर , यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सपाटे यांनी केले .

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

धार्मिक सण, जयंती उत्सव परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी