vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

राज्य प्रतिनिधी-‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय #क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे #टीबी सारख्या #संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करण्यात आले असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी सांगितले.

लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेवर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार सुनील शिंदे, डॉक्टर्स, आशा सेविका आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.#टीबीमुक्तभारतअभियान#टीबीमुक्तमुंबई

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव ‘सेतू सुविधा’ केंद्रांच्या माध्यमातून सुलभ प्रशासनासाठी सन्मान; ‘सेवा हक्क दिनी’ मुख्य सचिवांच्या हस्ते गौरव

३ महिने पाठपुरावा करूनही ‘एस्.टी.’चे ७२% संपर्क क्रमांक ‘डेड’ आता आश्वासन नको; संपर्क यंत्रणा सुरू करा -‘सुराज्य अभियान’मुंबई आणि नवी मुंबई येथे परिवहन महामंडळाना निवेदन..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश