vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अनुकंपा उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे वाटप होणार !· जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन· एमपीएससीच्या ५० उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळणार

अनुकंपा उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे वाटप होणार !· जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन· एमपीएससीच्या ५० उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळणार

बुलढाणा, प्रतिनिधी: मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी 150 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमात 184 अनुकंपा उमेदवारांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शिफारस प्राप्त 50 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे. यात अनुकंपा गट क व ड प्रवर्गातील 184 उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या विभागासाठी 36, जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागासाठी 82, नगरपरिषदेसाठी 57, पोलीस विभागासाठी 9 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क सेवा मुख्य परीक्षाअंतर्गत 50 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केले जाणार आहे.या कार्यक्रमाला पालकमंत्री, सहपालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत

संबंधित पोस्ट

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग निदानाविरुद्ध जनजागृती करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा-केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

अभ्यासिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे