vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

रायगड, प्रतिनिधी : संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व पराक्रमाची साक्ष देणारे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या मान्यतेसह या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून रायगड किल्ल्यावर आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. राजसदरपासून लेझीम पथक व पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळ येथे जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत पोलीस मानवंदना दिली. तसेच गडावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.

यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) महाड, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

०००

संबंधित पोस्ट

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 389 अर्ज प्राप्त

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना २ कोटी २५ लाखांचे अर्थसहाय्य

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनो, ई-नाम प्रणालीव्दारे शेतमालाची विक्री करा 30 हजार शेतकऱ्यांची नोंदणी· 35 लाख क्विंटल शेतमालाच्या विक्री1300 कोटी रुपयांची उलाढाल…

vishwatmaklokswamivarta

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

vishwatmaklokswamivarta