vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**

*शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**

मुंबई प्रतिनिधी –

शिवसेना ठाणे जिल्ह्याचे खासदार आणि प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांच्यासोबत आनंदमठ ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे उपाध्यक्ष श्री. मनोज शिंदे यांच्या पुढाकारात,सरचिटणीस श्री.पांडुरंग पाटील यांच्या समन्वयातून मुंबई आणि ठाण्याचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी मनपा प्रशासन कार्यरत असली तरी लोकसहभाग आणि सेवानिवृत्त मनपा अधिकारी यांच्या अनुभवाचा उपयोग करून ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे एक समिती गठित करून प्रशासनाचे निर्णय लोकाभिमुख करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती.यासाठी मुंबई आणि ठाण्यातील जाणकारांनी एकत्र येऊन या मीटिंग साठी श्री.तानाजी घाग यांची नियुक्ती केली होती.

या चर्चेमध्ये ग्लोबल वॉर्मिग,पर्यावरणीय पडझड,प्रशासकीय प्रयत्न,शासकीय उपाययोजना आणि लोकसहभाग या विषयावर विस्तृत भाष्य झाले.

पर्यावरण संतुलनाशी निगडित स्वच्छता,आरोग्य,घन कचरा व्यवस्थापन,वृक्षारोपण आणि जतन,धूर धूळ आणि आवाज प्रदूषण सोबत नद्या नाले प्रदूषण आणि त्यास जबाबदार असणाऱ्या नागरिकांच्या संवेदना जाग्या करून जनजागृती करणे तसेच शासकीय किंवा प्रशासकीय योजना लोकाभिमुख करत असताना त्यामधून रोजगार निर्माण करणेसाठी ठाणे आणि मुंबई मनपा क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था,बचत गटांना बळ देणे. ह्या विषयावर जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन त्या योजना स्थानिक पातळीवर राबविणे याबाबत ठोस कार्यक्रम सेवानिवृत मनपा अधिकारी आणि पर्यावरण मित्र तानाजी घाग यांचा प्रस्ताव शिवसेना सरचिटणीस पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केला.श्री.म्हस्के  यांनीही या श्वासाशी निगडीत प्रस्तावास पाठिंबा दर्शविला आहे.

संबंधित पोस्ट

नगररचना विभागाने 2025-26 आर्थिक वर्षात जमा केला 541.84 कोटी रक्कमेचा विक्रमी महसूल…

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता-महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान,केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ…

vishwatmaklokswamivarta

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन..