vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी :- सन 2024-25 या वर्षाच्या खरीप हंगामात खरीप गावांची तसेच ज्या रब्बी गावांत दोन तृतीयांश पेक्षा जास्त खरीपात पेरणी केलेली आढळली आहे, त्या गावांची पैसेवारी देखील खरीप हंगामात जाहीर करण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील खरीप पिकांच्या पैसेवारीमध्ये खरीप गावे एकूण 667 व रब्बी गावे 298 अशा एकूण 965 गावांची खरीप हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.

 जिल्ह्यातील 971 गावांपैकी 667 खरीप गावे व 298 रब्बी गावे असे एकुण 965गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. तर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच मंठा तालुक्यातील चांदेश्वर व गोपेगाव हे गाव पुर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे तसेच गारटेकी, सोनुनकरवाडी व किर्तापूर तांडा या गावांना महसूल दर्जा प्राप्त नसल्यामुळे मंठा तालुक्यातील 5 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जालना जिल्ह्यातील पैसेवारी जाहीर केलेल्या एकुण 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. खरीप पिकांची हंगामी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुका – 151 गावे, बदनापूर-92, भोकरदन-156, जाफ्राबाद-101, परतूर-98, मंठा-117, अंबड-138, घनसावंगी-118 गावांचा समावेश आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा मायावती यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी– क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मिनी मंत्रालयाचा ३६ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर• प्रगत तंत्रज्ञान सक्षम समाज व शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना…

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर…

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …