vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

राज्य प्रतिनिधी-

बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर खासगी विकासकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात धाराशिव येथे भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करावी. याचबरोबरच येरमाळा व उमरगा येथील बसस्थानक देखील विकसित करण्यात यावे. असे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते  विधिमंडळात प्रांगणात धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात बैठकीत बोलत होते. बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यातील एस. टी. महामंडळाच्या विविध जागा भविष्यात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी विकासाच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहेत. या जागांचे शहरी, निमशहरी व ग्रामीण असे तीन गट तयार केले असून या तीन गटातील प्रत्येकी एक बसस्थानक याप्रमाणे तीन बस स्थानकाचे एक समूह करून त्यासाठी निविदा मागवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बस स्थानकांची निविदा मागवली जाणार असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, येरमाळा व उमरगा या बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सुसज्ज बसस्थानक, प्रसाधनगृह, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबरोबरच अद्यावत आगार या आगारामध्ये इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशन, सोलर प्लांट, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा असणार आहेत, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

यासंदर्भातील निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून बसस्थानकाच्या कामाला देखील लगेच सुरुवात केली जाईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी- पेन्शन अदालत     

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

vishwatmaklokswamivarta

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !