vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड, प्रतिनिधी :- भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयामध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने व सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या सहकार्याने 8 मार्च, 2026 रोजी “अस्मिता महिला लीग” स्पर्धाचे आयोजन सायन्स कॉलेज, नांदेड करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा मुख्य उददेश म्हणजे महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा सहभाग वाढविणे व स्थानिक स्तरावर क्रीडा चळवळ बळकट करणे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे, जिल्हास्तरावर क्रीडा संरचना व तांत्रिक क्षमता विकसित करणे हा आहे.

स्पर्धेची रचना क्रीडा प्रकारः अॅथलेटिक्स प्रस्तावित स्पर्धाः अ) धावण्याच्या स्पर्धा :100 मीटर, 200, 400 मीटर याबाबीचा समावेश असून यामध्ये वयोगटः 13 वर्षांखालील, 13 ते 18 वर्षे, 18 वर्षांवरील मुली व महिलांचा समावेश राहील.

वय पडताळणी नोंदणीच्या वेळी पुढील कागदपत्रांच्या आधारे वय निश्चित करण्यात येईलः 1) आधारकार्ड (प्राधान्याने), 2) राज्य/केंद्रशासनाने दिलेला जन्म तारीख नमूद असलेला पुरावा, 3) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र इत्यादी नोंदणी दरम्यान खेळाडूंचे वय, वजन व उंची नोंदविणे आवश्यक राहील. यासाठी नांदेड जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंनी ASMITA Portal वर आपली नांवे 07 मार्च, 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये पहिला, दुसरा व तिसऱ्या विजेत्या खेळाडूंना मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

तरी नांदेड जिल्हयातील 13 वर्षांखालील, 13 ते 18 वर्षे, 18 वर्षांवरील मुली व महिलां खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने अस्मिता पोर्टलवर आपली नांवे अपलोड करावी व 08 मार्च,2026 रोजी सकाळी 7.30 वा. सायन्स कॉलेज, नांदेड येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 9657092794 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विधानसभा निडणुक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीतील राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना विभागाने केलेली कारवाई…

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाचा झोपडपट्टी वासीयांच्या प्रश्नांवर उद्या आझाद मैदानात घर हक्क मोर्चा*

कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र)पुरस्कार सन २०२२-२3 साठी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आजपासून 10% पाणीकपात, पालिके चे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या एक रक्क्मी परतावा योजना लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta