vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका व जिल्हा चिकित्सालये तसेच फिरते दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित

सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका व जिल्हा चिकित्सालये तसेच फिरते दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित

नांदेड, प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील पशुपालकांना सकाळच्या सत्रात पशुवैद्यकीय सेवा सुलभ व्हावी तसेच कार्यक्षेत्रातील गावांना नियमित भेटी देऊन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविता याव्यात, या उद्देशाने राज्यातील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाने व फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. 28 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार दि. 1 मार्च 2026 पासून पुढील सुधारित वेळा लागू करण्यात आल्या आहेत

सुधारित वेळापत्रक :• सोमवार ते शुक्रवार : सकाळी 8 ते दुपारी 1.30 व सायं. 3 ते 5• शनिवार : सकाळी 8 ते दुपारी

जिल्हा व तालुका स्तरावर विशेषज्ञ सेवा तसेच पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुपालक व शेतकरी यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम बाबुराव खुणे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी-वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर शहीदी समागमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

राज्यभर एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका सुरु लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य सेवांना नवी गती

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना.

vishwatmaklokswamivarta

महसूल सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिरात दीडशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी…