vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा! – हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा! – हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन

 

राज्य प्रतिनिधी-   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. आजपासून बरोबर ३५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटनेला १९ जून २०२६ रोजी तब्बल ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक त्रिशताब्दी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना केले आहे.

 

     स्वराज्याचे पहिले सेनापती नेताजी पालकर यांना मुघलांनी कपटाने कैदेत टाकले होते. अत्यंत हालअपेष्टा करून त्यांना बळजबरीने मुसलमान बनवण्यात आले आणि त्यांचे नाव ‘मुहम्मद कुली खान’ असे ठेवण्यात आले. अनेक वर्षे परधर्मात आणि परभूमीत राहूनही नेताजींचे मन स्वराज्यासाठी तळमळत होते. जेव्हा ते मुघलांच्या तावडीतून सुटून पुन्हा रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी आले, तेव्हा महाराजांनी धर्मशास्त्रानुसार विधीवत त्यांचे ‘शुद्धीकरण’ केले. जेधे शकावलीनुसार शके १५९८, आषाढ वद्य ४ (१९ जून १६७६) या दि‍वशी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात स्वीकारण्यात आले.

     याविषयी बोलताना समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, आज ३५० वर्षांनंतरही हा इतिहास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आहे. विविध आमिषे, दबाव किंवा छळवणुकीला बळी पडून आपले लाखो हिंदु बंधू-भगिनी धर्मांतरित झाले आहेत. आजच्या काळात ‘लव्ह जिहाद’सारख्या सुनियोजित संकटाला बळी पडून आपल्या अनेक हिंदु युवती परधर्मात ओढल्या जात आहेत. ‘ती गेली तर जाऊ द्या, आता तिचा व आमचा काही संबंध नाही’, या मानसिकतेचा हिंदु समाजाने आता त्याग केला पाहिजे. प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून फसवल्या गेलेल्या आपल्या मुलींना आणि बहिणींना पुन्हा सन्मानाने हिंदु धर्मात आणि समाजात सुरक्षित स्थान देण्यासाठी या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समस्त हिंदु समाज, संत आणि संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. जे बांधव आणि विशेषतः ज्या भगिनी मूळ प्रवाहात (हिंदु धर्मात) परत येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी आपण आपले दरवाजे आणि मने खुली केली पाहिजेत.श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती(संपर्क : ९९८७९ ६६६६६)

 

फोटो कॅप्शन- पहिले सेनापती नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण करवून घेतांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (प्रातिनिधीक चित्र)

संबंधित पोस्ट

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ..

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण…